मावळ ऑनलाईन –नगरपंचायत हद्दीतील वैकुंठ स्मशानभूमीची दूरवस्था झाली (Vadgaon Mava)आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोकाकुल कुटुंबीयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यातच काम पूर्ण होणे अपेक्षित असलेली निवारा शेडची दुरुस्ती अद्यापही संथ गतीने सुरू असून, पावसाळ्यात ही कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने नगरपंचायत प्रशासनास धारेवर धरले असून कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहर भाजपाध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने नगरपंचायतीकडे निवेदन सादर केले. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी वेळेवर कामे न होणे ही केवळ निष्काळजीपणाच नाही, तर नागरिकांच्या भावना दुखावण्यासारखा गंभीर प्रकार आहे,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Lonavala: लोणावळा सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक
स्मशानभूमीत नागरिकांना निवारा नसल्यामुळे पावसात भिजावे लागत आहे. भाजपाने कामांना गती देऊन त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या शिष्टमंडळात माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी अध्यक्ष अनंता कुडे, युवक अध्यक्ष अतिश ढोरे, पवन दंडेल, शेखर वहिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा
सुविधांचा अभाव
स्मशानभूमीत दहनशेडला चिमणीच नसल्यामुळे धुराचा त्रास आजूबाजूच्या परिसराला होतो. रात्रीच्या वेळी अंधारातच अंत्यविधी करावा लागतो. त्यामुळे विद्युत व्यवस्था तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली. पंचमुखी मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यामुळे अंतिम यात्रेच्या वेळी अडथळे निर्माण होतात. हे पार्किंग तातडीने हटवावे, अशी भूमिका भाजपाने मांडली.