मावळ ऑनलाइन : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Umakant Mahajan) उपाध्यक्षपदी उमाकांत लक्ष्मण महाजन यांची निवड करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,ज्येष्ठ नेते गणेश आप्पा ढोरे,विठ्ठल शिंदे,दीपक हुलावळे, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत,युवक अध्यक्ष किशोर सातकर आदींच्या हस्ते महाजन यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृहाचे आवारात झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी महाजन यांना निवडीचे पत्र दिले.

महाजन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तळेगाव स्टेशन मधील राजगुरव कॉलनीतील श्री गणेश प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून कार्यरत ( Umakant Mahajan) आहेत.
आपली राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी ( Umakant Mahajan) आणि आतापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असल्याचे तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
महाजन यांच्या निवडीने तळेगाव शहर पंचक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा ( Umakant Mahajan) वर्षाव होत आहे.