मावळ ऑनलाईन – शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी (Umabai Dabhade Service Foundation)शिक्षकांनी विशेष प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले.
सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान मावळ यांनी आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार (Umabai Dabhade Service Foundation)सभेत आमदार श्रीकांत भारतीय बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे,सुरेश धोत्रे,रवींद्र दाभाडे वृषालीराजे दाभाडे, सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील,अध्यक्ष दीपक दाभाडे, तळेगाव दाभाडे शहर भाजपचे अध्यक्ष चिराग खांडगे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, गिरीश खेर,अण्णासाहेब दाभाडे, शोभा भेगडे, सचिन टकले,इंदरमल ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
Envision 2K25 : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये “Envision 2K25” चे आयोजन
यावेळी तळेगावसह मावळ तालुक्यातील सुमारे ४०० शिक्षकांना फेटा बांधून,शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात त्या शिक्षकांचे खऱ्या अर्थाने कौतुक करणे हे समाजाचे काम आहे असे सांगून श्री भारतीय पुढे म्हणाले की, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे उपक्रम समाजात झाले पाहिजेत अशी अपेक्षा भारतीय यांनी व्यक्त केली.
Envision 2K25 : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये “Envision 2K25” चे आयोजन
पाठ्यपुस्तकातील भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा पहिल्या पानावर माध्यमिक शालेय शिक्षणापर्यंत आहे.परंतु उच्च माध्यमिकच्या पुस्तकावर का घेत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित (Umabai Dabhade Service Foundation)केला.
संवेदनशील विद्यार्थी घडवणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी असल्याचे सांगत आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या .
यावेळी संस्थेचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील म्हणाले की,समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा आमची संस्था ऋण मानते म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे.यावेळी स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी केले.प्रास्ताविक ॲड.विनय दाभाडे यांनी केले. आभार आनंद दाभाडे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी सहकार्य (Umabai Dabhade Service Foundation) केले.