मावळ ऑनलाईन – दारुंब्रे (ता. मावळ) गावातील शेतकऱ्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रस्तावित नगर रचना ( TP Scheme in Darumbre)योजनांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. श्री कालभैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या.
My Ramai Foundation : माय रमाई फाउंडेशन ट्रस्टतर्फे वधू-वर मेळावा संपन्न
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नुकत्याच ( TP Scheme in Darumbre)पंधरा नगर रचना योजना (टी.पी. स्कीम) प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी दारुंब्रे (ता. मावळ) येथील या योजनेला सरपंच उमेश आगळे,उपसरपंच मयूर वाघोले मा उपसरपंच गणेश सु वाघोले, रामदास वाघोले,ईश्वर वाघोले, शरद भालेकर,श्रीकांत वाघोले, ग्रामसेवक पठाण, तलाठी राहुल आर्डक, ग्रामपंचायत सदस्य,अनिल वाघोले मा चेअरमन,ग्रामस्थ व स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
येथील श्री कालभैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी ( TP Scheme in Darumbre)आपल्या भावना व्यक्त करीत हा विरोध केला. विरोध करताना शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले की, आमच्या गावामध्ये गायरानाची ८० एकर जागा कारखान्यांनी घेतली आहे आणि काही जागा कुसगावमधील धरणात गेली आहे. त्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन, दारुंब्रे गावातील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे आणि पवना कालव्याचा काही शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम झाला आहे.
नव्याने (पीएमआरडीए) टीपी योजनेंतर्गत आपल्या शेतकऱ्यांच्या मातीचा विचार करावा लागेल, आणि महाळुंगे येथील शेतकऱ्यांचे टीपी प्लॅन अजून पूर्ण झालेले नाहीत. लहान शेतकऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
या योजनांचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे अडकून पडण्याची ( TP Scheme in Darumbre)भीती आहे. शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी या योजनेचे एखादे रोलमॉडेलही प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे शेतकरी यामध्ये फसण्याचा आणि वर्षे वाया जाण्याचा धोका असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या बैठकीत केला आहे.
जमीन अधिग्रहण: शेतकऱ्यांच्या जमिनी टीपी योजनेत घेतल्या ( TP Scheme in Darumbre) जात असून त्याबदल्यात योग्य मोबदला मिळणार नाही, अशी भीती आहे.
शेतीवर परिणाम: टीपी योजनेमुळे शेतीयोग्य जमीन कमी होईल आणि पारंपरिक शेती व्यवसाय धोक्यात येईल.
पर्यावरणीय चिंता: वृक्षतोड, जलस्रोतांवर परिणाम, आणि जैवविविधतेचा ऱ्हास.
ग्रामस्थांचा सहभाग नसणे: योजना तयार करताना स्थानिक लोकांचे मत विचारात घेतलेले नाही. ( TP Scheme in Darumbre)