मावळ ऑनलाईन – अंदर मावळ भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगात ( Teachers Day)वसलेल्या भोयरे गावातील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना डिजिटल सक्षमीकरण ॲप वाटप करून एक आगळावेगळा शिक्षक दिन समारंभपूर्वक साजरा झाला.
डिस्ट्रिक्ट ३१३१ बेसिक एज्युकेशन अँड लिट्रसी अंतर्गत शिक्षक दिन साजरा करताना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ अथवा सन्मान चिन्ह देण्याऐवजी डिस्ट्रिकने अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षकांसाठी डिजिटल सक्षमीकरण ॲप तयार केला आहे.ज्यामध्ये शिक्षकांनी आपल्या मोबाईल मध्ये अपलोड केल्यानंतर त्यांना अध्यापनाच्या सर्व विषयांची समर्पक माहिती आत्मसात करता येईल.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून डिजिटल सक्षमीकरण ॲप वाटप ( Teachers Day)करण्याचा उपक्रम रोटरी डिस्ट्रिक्टने सुरू केला आहे. त्यानुसार भोयरे शाळेतील शिक्षकांना समारंभ पूर्वक ॲपचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर याच शाळेतील इयत्ता १०वीतील ८५ विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी स्टडी ॲप देण्यात आले.
Samaj Ratna Award : ह भ प संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
शिक्षकांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून( Teachers Day) अध्यापन करावे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ साध्य करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या व नवीन अध्यापन पद्धतीची सांगड घालून अध्यापन करावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार काम करावे तसेच विद्यार्थ्यांनी स्टडी ॲपचा अभ्यास करून खूप मोठे व्हावे असे शिंदे यांनी सांगताना रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती दिली.
Pune Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार, आज शहरात हलक्या सरींची शक्यता
बेसिक एज्युकेशन अँड लिट्रसी विभागाचे डिस्ट्रिक को डायरेक्टर संदीप मगर यांनी डिजिटल सक्षमीकरण ॲप बद्दल शिक्षकांना माहिती सांगताना अध्ययन( Teachers Day) अध्यापन पद्धतीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता वाढ होण्यास निश्चित मदत होते. शिक्षकांना मोबाईलमध्ये ॲप अपलोड कसा करायचा हे संदीप मगर यांनी शिक्षकांना सांगताना स्टडी ॲप व टीचर अँप इत्यादी विषयी मार्गदर्शन केले.


रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या डायरेक्टर दिपाली पाटील यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मोबाईलचा वापर अभ्यासासाठी कसा करायचा, स्टडी ॲप अपलोड करताना संपूर्ण स्टेप्स सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितल्या. प्रश्न उत्तरे, संवाद, व शंका समाधान इत्यादीच्या माध्यमातून पाटील यांनी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन केले.
रोटरी चॅलेंजर्सचे अध्यक्ष वसुदेव लखिमले,लिट्रसी डायरेक्टर दशरथ ढमढेरे,प्रकल्प प्रमुख आनंदराव रिकामे आदींनी मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा ( Teachers Day) दिल्या.
विद्यालयाचे निवृत्त जेष्ठ लिपिक बाजीराव भोईरकर यांनी प्रास्ताविक केले.समाधान साखरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशालेच्या प्राचार्या झिनत पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.
सह प्रकल्प प्रमुख विश्वास कदम, सेक्रेटरी संजय मेहता, क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, रघुनाथ कश्यप,मोहन खांबेटे, विलास वाघमारे,सुनंदा वाघमारे,स्वाती मुठे,कमल ढमढेरे, वैशाली लगाडे आदीसह मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम ( Teachers Day) घेतले.