मावळ ऑनलाईन – नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयात शिक्षकांसाठी डिजिटल सक्षमीकरण टीचर ॲप ( Teacher App)वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी तंत्रज्ञानस्नेही उपक्रम राबविण्यात आला आहे. या ॲपच्या माध्यमातून शिक्षकांना संदर्भग्रंथ अभ्यासता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आयोजित श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे या माध्यमिक शाळेत नुकताच शिक्षकांसाठी डिजिटल सक्षमीकरण टीचर ॲप वाटप समारंभ थाटामाटात( Teacher App) संपन्न झाला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी एक टेक्नॉलॉजी युक्त अभिनव शैक्षणिक उपक्रम यावर्षीपासून सुरू केला आहे शिक्षकांना अध्यापन करताना अनेक संदर्भ ग्रंथांचा उपयोग करावा लागतो परंतु रोटरी डिस्ट्रिकने एका ॲपच्या माध्यमातून अध्यापकांना विविध विषयांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
हा ॲप अध्यापकांच्या मोबाईल मध्ये अपलोड केल्यानंतर त्यांना कोणत्याही विषयातील संदर्भ अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये अभ्यासता येतो व त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.शिक्षकांनी या टीचर ॲपचा वापर करून विद्यार्थी गुणवत्ता वाढ करावी असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना स्टडी ॲप व टीचर अँप यांचे शिक्षण प्रक्रियेतील महत्त्व विशद केले व रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती ( Teacher App) दिली.
लिट्रसी डायरेक्टर दशरथ ढमढेरे यांनी टीचर अँपचा अध्यापन प्रक्रियेत कसा वापर करायचा हे प्रात्यक्षिकाद्वारे कार्यशाळेत विशद केले. सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विनय गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यापिका वैशाली माळी यांनी केले. रोटरी सिटीचे सेक्रेटरी संजय मेहता, दशरथ ढमढेरे,विश्वास कदम, आनंदराव रिकामे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम ( Teacher App) घेतले.