situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon News : तळेगावच्या वैभवात भर! राज्यातले सर्वात उंच शिवशंभू शिल्प तळेगावात स्थापित होणार

Published On:

मावळ ऑनलाईन –ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहराच्या (Talegaon News) वैभवात आणखी भर पडली आहे. राज्यातील सर्वात मोठे आणि १४ फूट उंच असलेले शिवशंभू स्मारक शिल्प बुधवारी रात्री नियोजित चौथऱ्यावर क्रेनच्या सहाय्याने यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले. गेल्या दीड दशकांपासून तळेगावकरांनी पाहिलेले हे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून, लवकरच या भव्य स्मारकाचे अनावरण होणार आहे. या स्मारकामुळे तळेगावात शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे.

Fraud News : नामांकित विद्यापीठाची अडीच कोटींची ऑनलाइन फसवणूक; उच्चशिक्षित आरोपीला अटक


१६ वर्षांचे स्वप्न साकार हे भव्य स्मारक उभे करण्यासाठी शिवशंभू स्मारक समितीने २००९ पासून अथक परिश्रम घेतले. २०१० मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत याचे भूमिपूजन झाले होते. नगरपरिषदेने ९ गुंठे जागा स्मारकासाठी दिली. एकूण १२ फुटांच्या दगडी चौथऱ्यावर १४ फुटांचे हे भव्य पुतळे बसवण्यात आले आहेत. पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी त्र्यंबकेश्वर येथे गर्गे आर्ट स्टुडिओमध्ये दीड वर्षांच्या अथक परिश्रमाने ४ टन वजनाचे ब्राँझचे हे ओतीव शिल्प तयार केले आहे. या शिल्पातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातील (Talegaon News) आहेत.

Maval News : मावळ तालुक्यात महसूल सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन 

लोकसहभागातून साकारलेले शिल्प
या स्मारकासाठी सुमारे ८५ लाख रुपये खर्च आला असून, हा सर्व निधी लोकसहभागातून जमा करण्यात आला आहे. आमदार सुनील शेळके आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी या कामात विशेष लक्ष दिले. नगरपरिषदेने स्मारकासाठी आवश्यक परवानग्या आणि निधीची तरतूद केली असून, एकूण १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. सध्या स्मारकाच्या परिसराचे सुशोभीकरण युद्धपातळीवर सुरू (Talegaon News) आहे.

पुढील पिढीसाठी प्रेरणा

श्री शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील यांनी सांगितले की, १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे भव्य स्मारक प्रत्यक्षात उभे राहिले, याचा मोठा आनंद आहे. कोषाध्यक्ष संजय बावीसकर यांनी लोकसहभागातून साकारलेल्या या शिल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. “सर्व लोकांचे योगदान असल्याने याचे वेगळे महत्त्व आहे आणि हे स्मारक पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भव्य शिल्पाच्या अनावरणाची उत्सुकता आता वाढली (Talegaon News) आहे.

Follow Us On