मावळ ऑनलाईन – महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Talegaon Municipal Council Election) (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषद निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घड्याळ आणि कमळ चिन्ह असलेल्या उमेदवारांनाच महायुतीचा अधिकृत पाठिंबा मिळणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. महायुतीतील पदाधिकारी फक्त या दोन चिन्हांवर लढणाऱ्या उमेदवारांसाठीच प्रचार करतील, असेही सांगण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली (Talegaon Municipal Council Election) उमेदवार यादी जाहीर केली आहे. तालुकाध्यक्ष गणेश खाडगे यांनी ही यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार जाहीर करण्यात आले असून ते सर्व घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या यादीत प्रभाग 1 मधून आशा अशोक भेगडे, प्रभाग 2 मधून संदीप बाळासाहेब शेळके, प्रभाग 3 मधून सिद्धार्थ गोरख दाभाडे, प्रभाग 4 मधून गणेश मोहणराव काकडे, प्रभाग 5 मधून भारती सुरेश धोत्रे, प्रभाग 7 मधून सत्यम गणेश खांडगे, प्रभाग 9 मधून हेमलता चंद्रभान खळदे, प्रभाग 10 मधून संगीता सतीष खळदे आणि प्रभाग 12 मधून संतोष छबुराव भेगडे या उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती गणेश खाडगे यांनी दिली.
Juber Hangargekar : दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जुबेर हंगरगेकरची कसून चौकशी
महायुतीने निवडणुकीसाठी एकजुटीने प्रचार करण्याचा निर्णय घेतला असून तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदेत फक्त घड्याळ आणि कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, निवडणुकीची लढत आता अधिक चुरशीची होणार (Talegaon Municipal Council Election) आहे.



















