मावळ ऑनलाईन –शिवशाही परिवार तर्फे प्रतिवर्षी शिवचरित्र पारायण सोहळा नवरात्री उत्सवामध्ये घेण्यात येतो. या ऐतिहासिक सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते. सलग पाच दिवस संध्याकाळी 07:00 ते 08:00 शिवचरित्राचे वाचन व तदनंतर इतिहासकार आणि समाज प्रबोधकांची व्याख्याने असे रोजच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
24 ते 28 सप्टेंबर 2025 असे पाच दिवस हा सोहळा पार पडला.(Talegaon Dabhade) पहिला दिवस कडलक परिवाराकडे नवलाख उंब्रे, दुसरा दिवस दळवी परिवाराकडे लैटीस सोसायटी, तिसरा दिवस आगळे परिवाराकडे काळोखे वाडी, चौथा दिवस तांबे परिवाराकडे एम्पयर स्वेअर चिंचवड येथे आणि समारोप पाचव्या दिवशी बोराडे परिवार राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी जेष्ठ इतिहासकार श्री.पांडुरंग बलकवडेइतिहास संशोधक सुधीरथोरात व प्रत्येक दिवशी इतिहासकार आणि समाज प्रबोधक मंडळी उपस्थित होती.
Lonavala: गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
शिवशाही परिवारचे संस्थापक डॉ. प्रमोद बोराडे व डॉ. प्रिया बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,”हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरांत देव राहिले. धर्म, अध्यात्म, पोथीपुराण, संस्कृती, परंपरा सर्व काही महाराज साहेबांच्यामुळेच शिल्लक राहिले. नवरात्रोत्सवात देवीच्या उत्सवाचा जागर आपण करित असताना आपल्या महाराजांचे चरित्र प्रत्येकाने समजून घेऊन इतिहासापासून बोध घेतला पाहिजे. आजचा वर्तमान व येणारा भविष्यकाळ सुरक्षित आणि वैभवी बनविण्यासाठी शिवशाही परिवार तर्फे मोफत पारायणरुपी शिवचरित्र व इतिहासकारांची व्याख्याने गावोगावी घेण्यात येत आहेत. रोज व्याख्याने संपल्यावर समारोप छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन कारण्याची परंपरा आहे. या पारायण सोहळ्यात शिवचरित्रातील ‘जन्म ते राज्याभिषेक’ अशा पद्धतीने वाचन केले गेले.” असे मनोगत व्यक्त केले.



शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहास प्रेमी तथा सर्व श्रोते, वाचक व व्याख्याते व बऱ्याच मंडळींनी दैनंदिन मोठ्या गर्दीने या ऐतिहासिक पारायण सोहळ्याचे श्रवण केले. “नवी पिढी सक्षम, निर्व्यसनी, कर्तृत्ववान, चारित्र्यसंपन्न घडविण्यासाठी “शिवचरित्र” हा एकमेव पर्याय आहे. शिवचरित्राचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या स्वरूपात साजरा करावा” असे मत अनेक मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केले.