इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा गरबा उत्साहात संपन्न
मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय, (Talegaon Dabhade)यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि संस्थेच्या अन्य विभागांच्या एकत्रित समन्वयातून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या भव्य आठ एकरावरील खेळाच्या मैदानावर चार हजार विद्यार्थ्यांनी रास दांडियाचा आनंद घेतला. या कार्यक्रमात शिस्तीच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या खजिनदार निरुपा कानिटकर यांच्या हस्ते भोंडल्याची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे,उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय शिस्तबद्ध नियोजनात इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिस्तीच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणाऱ्या विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. या रास दांडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आली.
Pune:शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन
Talegaon Dabhade: बुल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची वाटचाल ही दिवसेंदिवस प्रगतीच्या यशोशिखराकडे सुरू आहे. संस्थेचा विविध विद्या शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण विकास होत असून नुकतेच यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. तसेच प्रस्थावित व्यवस्थापन महाविद्यालयही (MBA) लवकरात लवकर सुरू होणार आहे.
या रास दांडिया कार्यक्रमाप्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.