मावळ ऑनलाईन –सहाव्या मजल्यावर गॅलरी मध्ये कपडे वाळत घालत (Talegaon Dabhade)असताना तोल जाऊन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (4 सप्टेंबर) मनोहर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
रेवती ठाकरे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर नगर येथील विद्या विहार कॉलनी मधील द रियानो वेलन्सिया सोसायटी मध्ये रेवती यांचे कुटुंब सहाव्या मजल्यावर राहते. गुरुवारी सकाळी त्या घराच्या गॅलरी मध्ये स्टूलवर उभा राहून कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी
Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही

गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रेवती यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.




















