मावळ ऑनलाईन –श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक
श्री संत नामदेव महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त सकाळी श्री विठ्ठल मंदिरात नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष ह.भ.प. मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. बाळकृष्ण आरडे महाराज, उत्सव समितीचे सचिव विलासराव नवाळे, नारायण धामणकर,विलास गायकवाड,सोनबा गोपाळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
पहाटे संतोष गाडेकर कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात पांडुरंगाची काकड आरती व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त ह. भ. प. बाळकृष्ण आरडे महाराज, देवराम महाराज खराडे, अतुल काका देशपांडे आदी सेवेकरी उपस्थित होते.
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने ह. भ. प. मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली नामदेव गाथा पारायण सोहळा सुरू करण्यात आला.यावेळी दिलीप हेंद्रे, हरिदास वनारसे तसेच अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.