मावळ ऑनलाईन –बुल मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे (Talegaon Dabhade
)आमिष दाखवून तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची एक कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक झाली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूर येथील दोघांना अटक केली. हे आरोपी मुंबईला पळून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. अक्रम शमशुद्दीन शेख (३३, कोल्हापूर), विनय सत्यनारायण राठी (३४, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pune:शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन
Lonavala: गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
तळेगाव येथील तक्रारदार गुगलवर गुंतवणुकीबाबत माहिती घेत असताना त्यांना बुलमार्केट बाबत माहिती मिळाली. त्यात त्यांनी इंटरेस्ट दाखवला असता इंग्लंड येथील क्रमांकावरून त्यांना अज्ञातांचे फोन आले. आरोपींनी बुल मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख ८४ हजार ५५४ रुपये आणि एक कोटी ४४ लाख ७२ हजार रुपये किमतीचे दोन बिटकॉइन घेत त्यांची फसवणूक केली.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर येथील आरोपी निष्पन्न केले. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी अक्रम आणि विनय हे कारने मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्यावर त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी अक्रम हा वेगवेगळे बँक अकाउंट प्राप्त करत होता. तर विनय हा सिमकार्ड कंपनीत नोकरी करत होता. तिथे तो संबंधित बँक खाते ऑनलाईन अपडेट ते मुमबी येथील विराज जोशी नावाच्या व्यक्तीला सायबर फसवणुकीसाठी देत होते. आरोपी दुबई येथील एका व्यक्तीच्या संपर्कात राहून हे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पाटील, सोपान बोधवड, हेमंत खरात, माधव आरोटे, अभिजित उकिरडे, विशाल निचित, अतुल लोखंडे, प्रवीण शेळकंदे, स्वप्नील खणसे, मुकुंद वारे, संतोष सपकाळ, भाविका प्रधान, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.