मावळ ऑनलाईन –माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Talegaon Dabhade)आयोजित भेगडे तालीम मंडळाच्या धर्मवीर शंभूराजे या जिवंत देखाव्याचे शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता उद्घाटन होणार आहे. तळेगाव शहरांमध्ये स्वतंत्र पूर्व काळापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून भेगडे तालीम मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये धर्मवीर शंभूराजे या जिवंत देखाव्याचे मंडळाने आयोजन केले आहे.
मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश आप्पा भेगडे यांनी सांगितले की ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या निवासस्थानजवळ या जिवंत देखाव्याचे उद्घाटन होणार आहे.
Shri Dnyaneshwar Vidyalaya: जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेसाठी श्री ज्ञानेश्वर विद्यायातील दोन खेळाडूंची निवड
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक

यावेळी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे,माजी नगरसेवक किशोर छबुराव भेगडे,माजी नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे(पाटील) माजी नगरसेवक संतोष मारुती भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे,विश्व हिंदू परिषदेचे संतोष वसंतराव भेगडे( पाटील) माजी नगरसेविका सौ संध्याताई गणेश भेगडे, भेगडे तालीम मंडळाचे अध्यक्ष समीर शंकरराव भेगडे आदी मान्यवरांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन होणार आहे.
हिंदू सूर्य स्वराज्य रक्षक. धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे देव देश आणि धर्मासाठी त्याग. समर्पण. बलिदानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार शंभूराजें चा जिवंत देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे.
