मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा १० वा पदग्रहण समारंभ तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयाच्या दालनात रो.नितीन ढमाले (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २६-२७) यांच्या मार्गदर्शनाखाली थाटामाटात (Talegaon Dabhade) संपन्न झाला.
Shabdhan Kavyamanch : आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे
पवन मावळातील पवना धरण परिसरातील दुर्गम भागात रोटरी सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शाळा उभारून शिक्षण क्षेत्रातील मॉडेल स्कूल उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्याचा मनोदय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी करताना रोटरी सिटीच्या माध्यमातून भंडारा डोंगर, घोरावडेश्वर डोंगर व गहुंजे या ठिकाणी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी आमदार सुनील शेळके, नितीन ढमाले, भालचंद्र लेले,विवेक दिक्षित,सभापती शांताराम कदम,ह.भ.प.नंदकुमार भसे महाराज, साखर कारखाना संचालक सुभाष राक्षे,नरेंद्र ठाकर, विविध गावचे सरपंच, नगरसेवक, नागरीक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर (Talegaon Dabhade) उपस्थित होते.
Bhat Sheti : भात उत्पादक शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात शेती करण्याकडे कल
रोटरी सिटीच्या कार्याचे कौतुक करताना नूतन अध्यक्ष भगवान शिंदे संचालक मंडळ व नवीन नवीन मेंबर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विक्रमी सदस्य नोंदणी करत सन २०२५-२६ करीता रो. भगवान शिंदे यांनी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तर रो. सुरेश दाभाडे यांनी उपाध्यक्ष पदाचा व रो. संजय मेहता यांनी सेक्रेटरी पदाचा पदभार स्वीकारला. या समारंभा दरम्यान रोटरीचा अत्यंत मानाचा रोटरी व्होकेशनल अवॉर्ड संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.शंकर महाराज मराठे यांना सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला.
दिपप्रज्वलन, विठ्ठल मुर्ती पुजन, गणेश वंदना आणि स्व आमदार कृष्णराव भेगडे याना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ॲडमिन डायरेक्टर व प्रकल्प प्रमुख संतोष शेळके यांनी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत व प्रास्ताविक केले. सुरेश दाभाडे यांनी क्लबच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील भरीव कार्याचा आढावा उपस्थितांसमोर थोडक्यात माडला.क्लबचे ट्रेनर सुरेश शेंडे यांनी नूतन अध्यक्ष भगवान शिंदे यांचा परिचय करून (Talegaon Dabhade) दिला.
अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष भगवान शिंदे म्हणाले की सर्व सभासदांच्या सहकार्याने क्लबच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवितांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीवर भरीव काम करण्याचा मानस व्यक्त केला. व कार्यकारिणी जाहीर करून त्यांचे पिनअप करण्यात आले.
तर विक्रमी सदस्य नोंदणी केल्याबद्दल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने विवेक दिक्षित यांनी क्लबच्या अध्यक्षांचा सन्मान करुन शुभेच्छा दिल्या व आमदार सुनील शेळके यांना रोटरी सिटी चे मानद सभासदत्व बहाल करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान संस्थापक विलास काळोखे,अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे,दिलीप पारेख,संजय मेहता,सुरेश धोत्रे, हरिश्चंद्र गडसिंग,मनोज ढमाले, सुरेश शेंडे,संतोष शेळके, यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नवीन मेंबर्स यादी वाचन मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा यांनी केले. बुलेटीन चेअरमन डॉक्टर मिलिंद निकम संपादित सिटी फिनिक्स बुलेटीन व रोस्टर चेअरमन दशरथ ढमढेरे संपादित रोस्टरचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात (Talegaon Dabhade) आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.रो. गणपत जाधव, संग्राम जगताप, मनोज नायडू, रघुनाथ कश्यप, राजू कडलक, संतोष मोईकर,तानाजी मराठे, सूर्यकांत म्हाळसकर, विश्वास कदम,वर्षा खारगे, संजय चव्हाण, रामनाथ कलावडे, संजय वाघमारे, सुनंदा वाघमारे, कमल ढमढेरे, स्वाती मुठे, निलेश राक्षे, प्रसाद बानगुडे,आनंदराव रिकामे,दशरथ पुजारी, पुंडलिक देशमुख, मोहन खांबेटे,दिनेश निळकंठ, संतोष घोलप,मनीषा ननावरे,सोमनाथ गव्हाणे, दिपाली पाटील,देविदास मराठे, बळीराम मराठे, रामदास काजळे, लक्ष्मण घोजगे, राजेश बारणे, संपत शेटे,वैशाली लगाडे, मनीषा पारखे, संजय भागवत, अनिल नरवडे, नवनाथ पडवळ, मुकुंद तनपुरे,विलास वाघमारे, बाळासाहेब चव्हाण, नीलम रोहिटे,शरयू देवळे,अंताराम काकडे,गोपाळ नागरे, नरेंद्र ननावरे,अविनाश नागरे, दलवीर सिंग कोचर इ.सह क्लबच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन डॉ मिलिंद निकम व वैशाली कोयते यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुरेश दाभाडे (Talegaon Dabhade) यांनी मानले.