मावळ ऑनलाईन – सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे रविवार (दि.6) दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
ज्ञानोबा माऊलींचा जयघोष आणि टाळ , मृदुंगाचा नाद करत सरस्वती विद्या मंदिर ने दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते विठ्ठलाच्या भक्तीने आणि आषाढातील पावसांच्या सरींनी विद्यालयाचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष . सुरेश झेंडे व श्रध्दा झेंडे, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी व शिल्पा कुलकर्णी, खजिनदार सुचित्रा चौधरी व शेखर चौधरी, सदस्य विश्वास देशपांडे व. शुभांगी देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे आणि बालवाडी विभाग प्रमुख. सोनाली काशीद बाई, सर्व सहशिक्षक यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून विठ्ठलाची आरती झाली.या सोहळ्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच या दिंडी सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी व पालक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे कार्यवाह प्रमोद देशक, संस्थेच्या शिक्षण समिती सदस्या डॉ. ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे, सदस्य सुनिल आगळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Maharashtra Education Icon : यशोधन सोमण “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” पुरस्काराने सन्मानित
या दिंडी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले.या सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल रखुमाई, राधाकृष्ण तसेच वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते .या सोहळ्यात पर्यावरणाचे संदेश देणारी बॅनर घेऊन विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या, पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते. त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी व साक्षरता दिंडी काढण्यात आली. यावेळी डोक्यावर तुळस, कळशी घेऊन विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते.
Talegaon Dabhade Crime News : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
तसेच प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी लेझीम, नृत्य, रिंगण, झांज यांचे सादरीकरण केले.यानंतर पसायदानाने दिंडीची सांगता झाली व नंतर विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे लाडू खाऊ स्वरूपात वाटण्यात आले.