situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे नगरपरिषद आरक्षण सोडत आज जाहीर

Published On:

मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत (Talegaon Dabhade)बुधवारी (दि ८) रोजी नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. आरक्षण सोडत जाहीर होताच अनेक इच्छुकांचे प्रभागामध्ये मनाप्रमाणे आरक्षण प्राप्त न झाल्याने नाराजीचा सूर उमटला तर मनाप्रमाणे आरक्षण झालेल्यांनी आनंद उत्सव साजरा केला.

आज नगर परिषदेमध्ये आरक्षण सोडत पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्यधिकारी ममता राठोड यांनी सहकार्य केले.

या आरक्षण सोडतीमध्ये प्रथमतः अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट याची सोडत नगरपरिषद शाळेमधील सई शेजवळ,वैष्णवी तागड, उमेजा बासरे, आराध्या भालेकर, नेहा चव्हाण या विद्यार्थिनींनी चिठ्ठीद्वारे काढली. यानंतर आरक्षणात इतर मागासवर्ग व त्यानंतर सर्वसाधारण गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

Vadgaon Maval:वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर : महिलांचेच वर्चस्व

PMPML Library: स्क्रॅप बसमधून तयार झाले “पीएमपीएमएल वाचनालय” — आजपासून ‘वाचाल तर वाचाल’ उपक्रमाचा शुभारंभ

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणूका मधील आरक्षण पुढीलप्रमाणे .-

प्रभाग क्रमांक १ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रमांक २ – अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण ,

प्रभाग क्रमांक ३ – अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक ४ – अ) अनुसूचित जमाती महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक ५ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक ६ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रमांक ७ – अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक ८ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक ९ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला ,

प्रभाग क्रमांक १० – अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रमांक ११ – अ) ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण ,

प्रभाग क्रमांक १२ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण ,

प्रभाग क्रमांक १३ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक १४ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला ,

नगराध्यक्ष पद नागरिकांचे मतदानातून होणार असून यासाठी सर्वसाधारण म्हणून आरक्षण झाले आहे. तर आज १४ प्रभागातील २८ नगरसेवकांच्या प्रभाग सोडतीमध्ये आरक्षण निश्चित झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना याचा जबरदस्त धक्का बसला. तर अनपेक्षित पणे इच्छुक असणाऱ्या पैकी काहींना प्रभागात मनाप्रमाणे आरक्षण मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. आजच्या सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीस प्रमुख इच्छुकासमावेत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि ९ रोजी अधिकृत प्रभाग आरक्षण यादी प्रसिद्ध करणार असून दि १४ पर्यंत आक्षेप व हरकती घेण्यात येतील असे उपजिल्हाधिकारी तळेकर यांनी सांगितले.

Follow Us On