मावळ ऑनलाईन –इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात (Talegaon Dabhade)शुक्रवार (दि.३) रोजी अभिजात मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. या प्रसंगी सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कवी, संगीतकार प्रशांत मोरे उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमास प्राप्त झाल्या.
मुंबई दूरदर्शन,झी मराठी, आयबीएन लोकमत,मुंबई आकाशवाणी आणि विविध चॅनेल्सवर मुलाखतीतून महाराष्ट्राच्या काव्य रसिकांमध्ये लोकप्रिय असलेले लोककवी प्रशांत मोरे यांनी यावेळी स्वरचित व अन्य काही यांच्या प्रसिद्ध काव्य रचना सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी आईच्या निर्व्याज प्रेमाची महती सांगणारी, ‘तुझा हात परिसर माझा लोखंडी ग झुला, हात परिस लागता झुला सोन्याचा झाला’ ही कविता सादर करताच विद्यार्थी भावनिक झाले. तसेच ‘एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन,राघू एकला राहीन याद मैनेची येईन’ या कवितेने उपस्थित यांची मने जिंकली.बाई दुःखाच्या कष्टान लेपाव्या भेगा ही कविताही विद्यार्थ्यांवर विशेष प्रभाव पडणारी ठरली.


Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून शहरातील 70 हजार विजेचे खांब हटवणार
Talegaon Dabhade: नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीत ‘अविष्कार २०२५’ पोस्टर स्पर्धा संपन्न
घर कवितांचे आणि साहित्य दरबार या ई टीव्ही मराठीवरील मुलाखत आणि काव्यगायन या साम मराठी या दुरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमामुळे मोरे यांची लोकप्रियता महाराष्ट्रभर झाली. यावेळी बोलताना मोरे यांनी इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उपस्थितीबाबत कौतुक करत याचे सगळे श्रेय प्राचार्य मलघे यांचे असल्याचे सांगितले. या प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयातील इंद्रधनु या युवक महोत्सवाचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी कविता आणि काव्य लेखन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कवी हा शब्दांचा जादूगार असतो.शब्दांना कवेत घेऊन तो भवतालाचे चित्रण करीत असतो असे सांगत डॉ. मलघे यांनी मोरे यांच्या भक्कम साहित्यिक कारकिर्दीचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. आपली मराठी भाषा ही अभिजात असून विद्यार्थ्यांनी भाषेचा अभिमान बाळगत भाषिक कौशल्ये आत्मसात करावी असे सांगत डॉ.मलघे यांनी आधुनिकीकरणाच्या युगातील प्रादेशिक भाषांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार खंदारे यांनी केले. यावेळी अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका डॉ. खंदारे यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा.सत्यजित खांडगे यांनी मानले.