situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पकता, ध्येय व अथक प्रयत्नाने सक्सेस पासवर्ड तयार करावा- प्रा. डॉ. अशोक थोरात

Published On:

मावळ ऑनलाईन – “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून ध्येयाने(Talegaon Dabhade) प्रेरित होऊन,अथक प्रयत्नाने जीवनाचा सक्सेस पासवर्ड तयार करावा. त्यावरच पुढील यशाचा मार्ग सुकर होईल.असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि पुणे स्थित इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन इंग्लिश ह्या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. अशोक थोरात यांनी मांडले.

इंद्रायणी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,वाणिज्य विभागप्रमुख प्रा.रूपकमल भोसले, विज्ञान विभागप्रमुख डॉ.रोहित नागलगाव,डॉ.विजयकुमार खंदारे, प्रा.दीप्ती पेठ,डॉ.मधुकर देशमुख, डॉ.सदाशिव मेंगाळ,डॉ.सत्यम सानप,कला वाणिज्य विज्ञान विभागातील प्राध्यापक आणि प्रथम वर्षातील प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PMPML: श्रावण महिन्यात शिवलिंग तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पीएमपीएमएलची खास ‘पर्यटन बससेवा क्र.12’ सुरु

Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव



कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली.

इंद्रायणी महाविद्यालय झपाट्याने बदलत असून वेगवेगळ्या शाखा, संशोधन केंद्र, बीएससी कॉम्प्युटर सायन्स,फार्मसी कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज त्यांचा लेखाजोखा मांडणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि संस्था पदाधिकारी यांच्या बळावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा कायापालट झपाट्याने होत असून भविष्यात आणखी येऊ घातलेल्या अभ्यासक्रमाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविकात दिली.

पुढे बोलताना प्रा थोरात म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणात वेगवेगळ्या विद्याशाखेतील ज्ञान अर्जित करण्याची उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासा- बरोबरच भाषिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे भर दिला पाहिजे.भाषा ही सर्वव्यापी असून ती जगण्याच्या केंद्रस्थानी असते.”असेही प्रा थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“साक्षरता,माहिती मिळवणे, तिचे उपयोजन करणे, कल्पकता, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे या गोष्टी विद्यार्थ्यांनी आवर्जून आत्मसात केल्या पाहिजे.चाकण- मुंबई हायवेवर असलेले हे एकमेव महाविद्यालयातून सर्व सोयींनी संपन्न आहे. आता प्रश्न तुम्हीच तुम्हाला विचारायचे आणि उत्तरेही तुम्हीच शोधायचे तुम्हाला स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणे हे या स्वागत समारंभाचे प्रयोजन आहे. करिअर हे सतत घडत राहते. ती डायनॅमिक प्रोसेस आहे. एका ठिकाणी थांबवून करिअर होत नसते.अस्वस्थता हा प्रत्येक संशोधनाचा स्थायीभाव असतो. विद्यार्थ्यांनी चिकाटी,धडपड ह्या यश साध्य करण्यासाठीच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. स्टार्ट, प्लॅन, ॲक्शन यांचे उत्तम नियोजन केल्यास तुमचे ‘गोल’ तुम्हाला सहज साध्य करता येतील.आपण‌ नामांकित संस्थेत प्रवेश घेतला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करत तुमच्या महाविद्यालयात भेट दिल्यानंतर अमेरिकेतल्या क्लासरूमची आठवण झाल्याचा आवर्जून उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित ‘अजून येतो वास फुलांना’, आणि इतर चार पुस्तकांचा डॉ. थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि पेन देऊन प्राध्यापकांनी त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रम संपल्यानंतर प्राध्यापक सुरेश देवढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनचे महत्त्व आणि कार्य याविषयीची सविस्तर माहिती दिली. प्रा.डॉ. संदीप रतन कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले यांनी आभार मानले.

Follow Us On