मावळ ऑनलाईन – श्री गजानन महाराज सेवा मंडळ (ट्रस्ट), न्यू आनंद नगर, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आषाढ महिन्यानिमित्त सात दिवसीय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ११ जुलै २०२५ (आषाढ कृ. २) ते गुरुवार, १७ जुलै २०२५ (आषाढ कृ. ७) या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात हा भक्तिपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे.
या धार्मिक कथावाचनाचे विशेष आकर्षण म्हणजे निरंजनभाईजी महाराज (आळंदी) यांचे साक्षात प्रवचन. भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या वाणीतील श्रीमद् भागवत कथा दररोज सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत श्रींची महाआरती होणार आहे.
Dehugaon:देहूत डॉक्टर्स असोसिएशनकडून वृक्षारोपण
कथेच्या शुभारंभापूर्वी शुक्रवार, ११ जुलै रोजी सकाळी व्यासपूजन व कलशपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून, तो श्री गजानन महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष यादवेंद्र दत्तात्रय खळदे यांच्या हस्ते होणार आहे.
या सप्ताहीय धार्मिक कार्यक्रमाची सांगता गुरुवार, १७ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विशेष पूजा आणि धार्मिक विधींनी होणार आहे.
Sanatan Sanstha : सनातन संस्थेच्यावतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार !
श्री गजानन महाराज सेवा मंडळातर्फे परिसरातील सर्व भाविक भक्तांना या अध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे स्नेहपूर्वक आमंत्रण देण्यात आले आहे. संपूर्ण सप्ताहभर चालणाऱ्या या भक्तिरसपूर्ण वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.