मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथील पुरातन(Talegaon Dabhade) श्री गणपती मंदिरात श्रावण कृ. चतुर्थी मंगळवार दि. १२ ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सहस्त्रावर्तन महाभिषेक २१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थित मंगलमय वातावरणात सकाळी संपन्न झाला.
या वेळी देशहितासाठी सर्वत्र सुख समृद्धी शांती नांदावी व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हा विधिवत संकल्प श्रींच्या चरणी करण्यात आला.
PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड
तसेच ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करण्यात आला. स. १० वा. श्रींची महाआरती संपन्न होऊन आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली.
या निमित्ताने पंचक्रोशीतील भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी उत्स्फूर्त गर्दी केली होती.
रात्री ०९ : १३ मि. श्रींची शेजारती संपन्न झाली.