मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे या स्वयंसेवी संस्थेने मावळ तालुक्यात आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, शेती, सामाजिक या क्षेत्रात २ कोटी ९७ लाख रुपयांची समाजोपयोगी कामे एका वर्षात पूर्ण केल्याची माहिती अध्यक्ष कमलेश कार्ले यांनी बुधवारी (दि २५)पत्रकार परिषदेत दिली.
तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे, उपाध्यक्ष श्रीशैल मेंथे व सचिव प्रमोद दाभाडे, ॲडमिन प्रसाद मुंगी,माजी अध्यक्ष महेश महाजन,विश्वनाथ मराठे,विलास जाधव,भालचंद्र लेले,मंगेश गारोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात महिलांच्या तपासणी व शस्त्रक्रियांसाठी ५० लक्ष रुपये, लहान मुलांच्या हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी ३३ लक्ष रुपये, शिवणे शाळेतील स्वच्छतागृह व वर्गखोल्यासाठी तसेच कांतीलाल शहा विद्यालयास सौर ऊर्जा प्रकल्पास ४५ लक्ष रुपये, अंगणवाड्यांसाठी २१ लक्ष ८२ हजार रुपये, कॅन्सर क्लिनिंग व्हॅन ३९ लक्ष रुपये, स्वच्छतागृह ३१लक्ष ४२ हजार रुपये, शालेय स्मार्ट बोर्डसाठी १० लक्ष ९६ हजार रुपये, वैद्यकीय शैक्षणिक प्रकल्प ६२ लक्ष रुपये आदी समाजोपयोगी कामे पूर्ण केली असल्याचे अध्यक्ष कारले यांनी सांगितले.


गेली ३२ वर्ष रोटरी क्लब तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यात कार्यरत असून सामुदायिक विवाह सोहळा, गॅस शव वाहिनी, वॉटर फिल्टर, आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच शेतकऱ्यांसाठी बी बियाणे व शेती उपयोगी साहित्य, अंगणवाड्या, शाळा इमारती, समाज मंदिरे, स्वच्छतागृहे यासाठी भरीव अर्थसहाय्य केलेले आहे असे माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे व सचिव प्रमोद दाभाडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत उपाध्यक्ष श्रीशैल मेंथे यांनी केले.प्रास्ताविक माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी केले तर सचिव प्रमोद दाभाडे यांनी आभार मानले.