situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या पुढाकाराने हजारो सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित – वैभव निंबाळकर

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य ( Talegaon Dabhade) साधत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने ग्रुप केंद्र सी.आर.पी.एफ. तळेगाव दाभाडे केंद्रास आर वो वॉटर प्लॅन्ट चा लोकार्पण सोहळा समारंभ पूर्वक संपन्न झाला. आदर्श माता श्रीमती फुलाबाई बबनराव काळोखे व रोटरी सिटीचे संस्थापक विलासशेठ बबनराव काळोखे यांच्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Golden Rotary : नारीशक्ती देशाला पुढे घेऊन जाईल- रो संतोष परदेशी

भा.पु.से.डि.आई.जी. वैभव निंबाळकर, कमांडर कविंद्रकुमार चंद, रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे, सह प्रांतपाल भालचंद्र लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत १०५ वर्षांय फुलाबाई काळोखे काळोखे यांच्या हस्ते दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ताशी १००० लिटर शुद्ध पाणी देणाऱ्या या प्रकल्पामुळे हजारो जवानांच्या कुटुंबांना शुद्ध पाणी मिळाल्याने त्यांचे आरोग्य ( Talegaon Dabhade) सुरक्षित झाले असल्याची भावना डि.आई.जी. वैभव निंबाळकर यांनी व्यक्त करताना रोटरी सिटी करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सीआरपीएफ कॅम्प रोटरी सिटी बरोबर काम करील असे प्रतिपादन निंबाळकर यांनी करताना रोटरी सिटीच्या कामकाजाचे कौतुक केले. आणि फुलाबाई काळोखे यांचा विशेष सत्कार करत रोटरी सिटीचे आभार मानले.

 Pimpri News : पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रोटरीच्या कार्यपद्धतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडताना रोटरी सिटीचा आर वो वॉटर प्लांट हा उपक्रम अतिशय आदर्शवत आहे असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांनी करताना यापुढे देखील रोटरी सिटीच्या माध्यमातून मोठमोठे समाज उपयोगी उपक्रम ( Talegaon Dabhade) राबवताना आपण डिस्ट्रिक्टच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सदर प्रसंगी दिली. स्वतःच्या जीवाची बाजी लावत देशवासीयांचे संरक्षण करणारे जवान व त्यांच्या कुटुंबीयांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे विलास काळोखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.


रोटरी सिटी सदैव देश हिताचे आणि समाज हिताचे उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिल असे प्रतिपादन अध्यक्ष भगवान शिंदे यांनी आपल्या मनोगताद्वारे सांगताना पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी विषयक रोटरी सिटीच्या उपक्रमांची माहिती दिली.यावेळी सी.आर.पी.एफ. जवान, रोटरी सिटीचे पदाधिकारी व सदस्यांसह काळोखे परिवार उपस्थित होता.सचिव संजय मेहता, क्लब ट्रेनर सुरेश शेंडे,नितीन शहा, संग्राम जगताप, संतोष शेळके, तानाजी मराठे, निलेश राक्षे,आनंद रिकामे, रामनाथ कलावडे, गणपत जाधव,मोहन खांबेटे विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, संजय वाघमारे, मनोज नायडू, संजय भागवत,सुनंदा वाघमारे,शरयू देवळे,मनीषा पारखे, मनिषा ननावरे, वैशाली लगाडे इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब ॲडव्हायझर दिलीप पारेख यांनी केले. सूत्रसंचालन राजेश बारणे आणि मुकुंद तनपूरे तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी ( Talegaon Dabhade) केले.

Follow Us On