मावळ ऑनलाईन – डिस्ट्रिक्ट ३१३१ मेंबरशिप सेमिनार २०२५, (Talegaon Dabhade)कम्युनिटी हॉल पुणे येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाले असून त्यामध्ये मेंबरशिप विविध संवर्गातील अतिशय मानाची तब्बल ८ अवॉर्ड रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीला भव्य दिव्य समारंभात प्राप्त झाली.
समाजासाठी सिटी क्लब समाज उपयोगी विविधांगी उपक्रम घेत असतो त्या समाजाकडून कौतुकाची थाप मिळावी व समाजाप्रती असणारा आदरभाव व्यक्त करून सिटी क्लबच्या आनंदात समाजाचा सहभाग सदैव असतो म्हणून हा आनंद समाजाबरोबर साजरा करण्यासाठी व सिटी क्लबच्या आगामी योजना व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने पत्रकार परिषद आयोजित केल्याचे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना शिक्षण, आरोग्य, पर्यावरण,महिला सक्षमीकरण, देशभक्ती इ.क्षेत्रातील मागील दोन महिन्यात झालेल्या २२ प्रोजेक्टची माहिती पत्रकार परिषदेत दिली असून भविष्यात देखील आपण विविध क्षेत्रातील समाज उपयोगी उपक्रम घेणार असल्याचे सांगितले.
३५ दिवसांचे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप अभियान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली घरचा गणपती सजावट स्पर्धा, एस.एस.सी. विद्यार्थ्यांना स्टडी वाटप,शिष्यवृत्ती अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे टीचर ट्रेनिंग, महिलांसाठी विविध कोर्स सुरू करणे, आरोग्य शिबिरे अशा आगामी उपक्रमांची माहिती दिली व तळेगाव शहर पत्रकार संघ तळेगाव प्रेस फाउंडेशन यांचे स्वागत केले.
Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल
ज्येष्ठ क्लब अँडव्हायझर हरिश्चंद्र गडसिंग यांनी रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी मागील १० वर्षात रोटरी सिटी क्लबच्या माध्यमातून केले गेलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह सोहळा, पर्यावरण, लोकोपयोगी उपक्रम, इत्यादीची माहिती देताना १० वर्षांपूर्वी तळेगाव एसटी स्टँड येथे अत्याधुनिक पद्धतीचे २० लाख रुपये किंमतीचे शौचालय बांधून एसटी महामंडळाला लोकार्पण केले तसेच तळेगाव शहरात सुलभ शौचालयाची उभारणी केली परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत काळोखे यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर तळेगावची वाढती लोकसंख्या व बनेश्वर स्मशानभूमी येथे शौचालय व स्नानगृह नसल्याने खूप अडचणी येतात म्हणून तेथे सिटी क्लबच्या माध्यमातून शौचालय व स्नानगृह उभारण्याचा मनोदय डायरेक्टर संग्राम जगताप यांनी व्यक्त केला तर शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी वाहतूक कोंडीसाठी सोमाटणे फाटा लिंब फाटा व वडगाव फाटा येथे सिग्नल बसवण्याची मागणी केली असता रोटरी सिटीने यावर सर्व माहिती घेऊन प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
सूत्रसंचालन सेक्रेटरी संजय मेहता यांनी केले. मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार यांनी मानले.
मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा, क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, ॲडमिन संतोष शेळके,निलेश राक्षे, संग्राम जगताप,आनंद रिकामे, शरयू देवळे, स्वाती मुठे, दिपाली पाटील, वैशाली लगाडे,मनीषा पारखे, मनोज नायडू ,मोहन खांबेटे,विलास वाघमारे, रघुनाथ कश्यप, मुकुंद तनपुरे इ.सह १९ रोटेरियंन्स मेंबरशिप सेमिनारला उपस्थित होते.