मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथील पांडुरंग रामभाऊ पोटे (Talegaon Dabhade)यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन शाखा कोल्हापूर पुणे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील करत असलेल्या कार्याची दखल घेऊन दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे येथे मौलान अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे शेखर गायकवाड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे पाटील प्रा .प्रकाश कोळी तसेच मास्टर ट्रेनर यशदा पुणे विवेक गुरव सर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष संजय पवार जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रकाश चौधरी पुणे व सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश चौधरी यांनी केले.(Talegaon Dabhade ) त्यांनी कार्यक्रमाची उद्देश आणि हेतू सांगून विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अविष्कार फाउंडेशनचे काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे करत असलेल्या कामांचे कौतुक करून सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी अविष्कार फाउंडेशन यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम असे कार्य करत आलेले शिक्षक वकील सरपंच यांचा सत्कार केला अविष्कार फाउंडेशन करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली आणि सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या यशदाचे ट्रेनर विवेक गुरव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर व पुणे येथून अनेक मान्यवर उपस्थित होते परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे ,मावळ ,पुणे शाळेमध्ये पांडुरंग पोटे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गेली पाच वर्षे अविरत कार्य केले आहे. शाळेतील भौतिक सुविधांची गरज ओळखून जवळपास दोन कोटींची कामे विविध सामाजिक संस्था व कंपन्या यांच्या सीएसआर फंडातून करून घेतलेली आहेत.
सौर ऊर्जा विद्युत प्रकल्प, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वच्छतागृह, अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा कक्ष, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालयाची सुविधा, उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण शाळा डिजिटल आहे. प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व आनंददायी झाली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावी विशेष मार्गदर्शन वर्ग, तसेच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
Dahi handi : सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी आपची दही हंडी साजरी
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
पांडुरंग पोटे सरांचे उत्कृष्ट नियोजन व सुव्यवस्थित व्यवस्थापन कौशल्य यामुळे परांजपे विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ वर्षातील पुणे जिल्हा परिषद व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर पुणे जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. भौतिक सुविधांची उपलब्धता आणि गुणवत्ता संवर्धन यामुळे परांजपे विद्यामंदिर पालकांच्या पसंतीची पहिली शाळा ठरत आहे. पांडुरंग पोटे सर यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करून अविष्कार फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या गुरूंचा सन्मान केला आहे.



















