मावळ ऑनलाईन – वन्यजीव रक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा (Talegaon Dabhade)संदेश देत ‘वन्यजीव रेस्क्यूअर मावळ’ आणि पुणे वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम १० ऑगस्ट २०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहेत.
या विशेष उपक्रमामध्ये भाग घेऊन नागरिकांनी वन्यजीव संरक्षण व निसर्ग संवर्धन यासोबतच सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरण जागृतीसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेद्वारे लहानग्यांना निसर्गाबाबत कळकळ निर्माण व्हावी, असा उद्देश आहे.
रक्तदान शिबिराद्वारे समाजात आरोग्य जागृती व मदतीचा हात पुढे करण्याचा संदेश दिला जाणार आहे. “आरोग्यदायी समाज आणि हरित भविष्य” या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Tathawade: कार च्या धडकेत 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव
आपली उपस्थिती समाज परिवर्तनात मोलाची ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
➡️ अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 ९८२२५५५००४ / ९९२२४८०९०८ / ८०८७३४२४००
📍 ठिकाण: सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे
📅 दिनांक: १० ऑगस्ट २०२५
🕘 वेळ: सकाळी ९ वाजता पासून