मावळ ऑनलाईन – मानाचा पाचवा ( Talegaon Dabhade News) गणपती प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा दि.१४/०८/२०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध महिला उद्योजक स्मित केक ( Talegaon Dabhade News) शाॅपच्या संचालिका सोनालीताई खवरे व सतर्क महाराष्ट्रच्या संपादिका रेखाताई भेगडे हे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक प्रमुख वैष्णवी आंबीकर यांनी करून दिला.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते मंडळाचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.
उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत ( Talegaon Dabhade News) मंडळाला शुभेच्छा दिल्या. आधारस्तंभ अनिल फाकटकर यांनी मंडळाच्या वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी साठी विशेष मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे शुभम फाकटकर तर अध्यक्षीय मनोगत राधिका हेरेकर व आभार प्रदर्शन माजी उपाध्यक्ष प्रथमेश प्रदीप भालेराव तर सुत्रसंचालन अवधुत कुलकर्णी यांनी केले.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनिता साले , आर्यन कट्टी ,विश्वेश जायताडे ,आर्यन जायताडे ,श्रेयस मोरे ,समर्थ झोडगे , सायली मेहता , प्रकृती गोरीवाला , जुई कुलकर्णी , सहिल येवले , हिमांशी थांगेय , गायत्री तांबोळी , आर्यन कुलकर्णी , मधुरा हरपुडे , प्रांजल पांचोली , समिरा इनामदार, वर्धन गोयल , प्रणित माळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे आधारस्तंभ दत्तात्रय मेढी यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती ( Talegaon Dabhade News) दिली.