राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलनाचा इशारा
मावळ ऑनलाईन – तळेगाव – चाकण या राष्ट्रीय महामार्गावर ( Talegaon Dabhade News) तळेगाव स्टेशन चौकामध्ये पडलेले खड्डे त्वरित बुजवावे, या मागणीसाठ रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अजून किती अपघात पाहणार ? सुस्त प्रशासनाला कधी जाग येणार? असे प्रश्न यावेळी आंदोलकांनी विचारले. संतप्त नागरिकांनी तळेगाव स्टेशन चौकात केलेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
तळेगाव स्टेशन चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारे भले मोठे खड्डे असून आंदोलकांकडून या खड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. लवकर खड्डे बुजविले नाहीतर (दि ६) मोठे जन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष खांडगे,जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत, ज्येष्ठ समाजसेवक दिलीप डोळस, नितीन फाकटकर, मिलिंद अच्युत, धीरज सावंत,अमित प्रभावळकर, सुनील उर्फ मुन्ना मोरे सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी, ( Talegaon Dabhade News) झाले होते.
तळेगाव स्टेशन चौकामध्ये तळेगाव चाकण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ( Talegaon Dabhade News) याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील त्यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत. टोलवाटोलवी चालू आहे,खड्डे बुजविण्याची जबाबदारी घेत नाही.
शाळा, कॉलेज, दवाखाना, आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिकीकरण आदी कारणांमुळे हा रस्ता रहदारीचा झाला आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. याची दखल घेऊन संबधित प्रशासनाने त्वरीत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावे.अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आंदोलकांनी ( Talegaon Dabhade News) दिला.