मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडेमधील शाळा चौक येथील ( Talegaon Dabhade News) विठ्ठल मंदिर संस्थानच्यावतीने नवरात्र उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ व भजनकरी आणि सेवेकरीं यांचा सन्मान करण्यात आला.
Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग महिला आरक्षण
कार्यक्रमाचे नियोजन उमा दाभाडे, नंदा पिंगळे,विजया शिळीमकर, शारदा मोरे आणि सुलोचना भेगडे यांनी केले होते.
कार्यक्रमात सक्रिय सेवेक-यांचा गौरव करण्यात आला. ( Talegaon Dabhade News) त्यात प्रामुख्याने सेवेकरी सोनबा गोपाळे गुरुजी, मृदुंग वादक सुभाष बेल्हेकर,विणेकरी प्रभाकर सरोदे आणि पुरोहित अतुल देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘आदर्श मातृशक्ती सन्मान’अंतर्गत फुलाबाई कसाबी, शारदा मोरे, सीमा शेलार, नंदा खराटे आणि विमल पवार यांचाही गौरव करण्यात आला.
Maharashtra: राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

याशिवाय उखाणे स्पर्धेत विजेते ठरलेल्या मंगल खोल्लम आणि लीला लाव्हरे ( Talegaon Dabhade News) यांचा देखील सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशा शेळके आणि सर्व महिला भगिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
संस्थांचे विश्वस्त ह.भ.प. बाळकृष्ण आरडे,महाराज यतीनभाई शहा, प्रशांत दाभाडे, शामराव भेगडे,शेखर गुंड,मुरलीधर महाराज ढेकणे, विलास गायकवाड यांच्या सहयोगाने कार्यक्रम ( Talegaon Dabhade News) पार पडला.