संपादक रेखा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा.
मावळ ऑनलाईन – अल्पावधित मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपले प्रस्थ वाढविण्यात यशस्वी ठरलेल्या ‘सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल’च्या मोबाईल ऍप’चे मोठ्या दिमाखात ( Talegaon Dabhade News) उदघाट्न झाले. तसेच सतर्क महाराष्ट्र’च्या सर्वेसर्वा, संपादिका रेखा भेगडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, उद्योजक रामदास काकडे आणि संस्था कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश, तसेच ज्येष्ठ पत्रकार तथा स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी ११ हजार रुपये अर्थसहाय्य निधीचा धनादेश सतर्क महाराष्ट्र ऍपच्या प्रमोशनसाठी रेखा भेगडे यांच्याकडे सुपूर्त केला.
सतर्क महाराष्ट्र एॕपचा उदघाटन सोहळा नुकताच इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला. ऍपचे उदघाट्न इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, इंद्रायणी विद्यामंदिर संस्येचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे पिपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, निर्मल वारीचे संयोजक संतोष दाभाडे, मनसे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास काकडे यांनी सतर्क महाराष्ट्र ऍपचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करीत संपादक रेखा भेगडे यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, की रेखा भेगडे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. गुणी पत्रकारांसाठी इंद्रायणी संस्थेचे सहकार्य सदैव राहील.
रेखा भेगडे यांचे पत्रकारिकेतेच्या आणि सामाजिक कार्याच्या योगदानावर समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा पत्रकारितेचा आलेख वाढत जाओ, अशा शब्दात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत शेटे यांनी रेखा भेगडे यांच्या बालपणापासून ते डिजिटल मीडियाच्या वाटचालीपर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला.गणेश भेगडे म्हणाले, की पत्रकारांनी ( Talegaon Dabhade News) निःपक्षपाती काम करणे अपेक्षित आहे. विशेषतः राजकीय बातम्या करताना दोन्ही बाजूंना स्थान दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब उर्फ जगन्नाथ काळे ( Talegaon Dabhade News) यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी, प्रास्ताविक प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी, तर आभार रेखा भेगडे यांनी मानले.