मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade News) परिसरात महिला शेतकऱ्यांसाठी भात शेतीवरील विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन ‘आत्मा’ प्रकल्प संचालक पुणे व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मावळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले. गावातील महिलांना भात लागवड, पियाडीची निवड, बियाणे प्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे, तसेच चारसूत्री लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण या सर्व बाबींवर सखोल मार्गदर्शन मिळाले.
Pune Rain Update : पुण्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ३३ टक्के अधिक पाऊस
महिला शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यशाळेमुळे गावातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून त्यांचा उत्पादनक्षमतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची संधी मिळाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भात शेतीत वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब कसा करावा, उत्पादनात वाढ कशी साधता येईल आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन ( Talegaon Dabhade News) केले.
Rotary City : समाज परिवर्तनात महिलांचे योगदान महत्वाचे – सारिका शेळके
या प्रशिक्षणामुळे महिलांच्या आत्मनिर्भरतेला बळकटी मिळणार असून, त्यांच्या हातून होणारी शेती अधिक सक्षम आणि फायद्याची ठरणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या प्रशिक्षण शाळा इतर गावांमध्येही राबविण्याचा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यशाळेमुळे महिलांच्या शेतकरी वर्गात नवीन उत्साह संचारला असून, त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतात वापर करण्याची तयारी ( Talegaon Dabhade News) दर्शवली आहे.