मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व ग्युफिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या (Talegaon Dabhade News) संयुक्त विद्यमाने हाडांची घनता तपासणी शिबिराला येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला.
Pune Metro : १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार
कार्यक्रमासाठी रोटरी परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Talegaon Dabhade News) तसेच या शिबिरासाठी रो.यादववेंद्र खळदे, प्रेसिडेंट श्रीशैल मेंथे,रो.प्रसाद मुंगी,डॉ वर्षा वाढोकर, प्रमोद दाभाडे, महेश महाजन, भालचंद्र लेले,मंगेश गारोळे,शंकराव जाधव,नागराज मुंडर्गी,नितीन फाकटकर तसेच रो. शर्मिला शहा, फर्स्ट लेडी मीनाक्षी मेंथे,अर्चना चितळे वैशाली दाभाडे,कल्याणी मुंगी,रेणुका जाधव उपस्थित होते.

रोटरी क्लबने सातत्याने हे शिबिर गेली १४ ते १५ वर्ष घेत आली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच नागरिक रांगेत उभे होते व जवळ जवळ १९७ लोकांनी याचा लाभ (Talegaon Dabhade News) घेतला.
ग्युफीक फार्मास्युटिकल्स तर्फे सर्व लोकांना चार दिवसांची मोफत औषधे आणि तेल देण्यात आले व आहार विषयक सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दरम्यान धन्वंतरी पूजन प्रेसिडेंट श्रीशैल मेंथे, मेडिकल डायरेक्टर डॉ वर्षा वाढोकर, सेक्रेटरी प्रसाद मुंगी, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद दाभाडे व प्रोजेक्ट चेअरमन डॉ ज्योती मुंडर्गी,फर्स्ट लेडी मीनाक्षी मेंथे,वैशाली दाभाडे अर्चना चितळे यांच्या हस्ते (Talegaon Dabhade News) झाले.
दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवन म्हणून सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नंतर हाडांची घनता तपासणीचे व आयुर्वेदिक औषधाचे महत्त्व डॉक्टर ज्योती मुंडर्गी यांनी (Talegaon Dabhade News) सांगितले. ग्युफिक फार्मास्युटिकल्सच्या सततच्या सहयोगाने सातत्याने आपण हे शिबिर घेऊ शकलो त्याबद्दल रोटेरियन प्रेसिडेन्स श्रीशैल मेंथे यांनी मनापासून आभार मानले. मेडिकल डायरेक्टर डॉ वर्षा वाढोकर यांनी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ रो. यादवेंद्र खळदे यांच्या सहकार्याने गजानन महाराज मंदिरात आपण हे शिबिर विनामूल्य घेऊ शकलो.
डॉ.वर्षा वाढोकर,डॉ.पद्मजा वढाळकर डॉ.अपूर्वा, डॉ ज्योती मुंडर्गी यांनी रुग्ण तपासणी केली आणि ग्युफीक फार्माचे श्री. शर्मा व नवीन, तसेच रूपाली सकपाळ यांचे सहकार्य (Talegaon Dabhade News) मिळाले.