अ.भा. म. नाट्य परिषद महिला मंचाचा कार्यक्रम
मावळ ऑनलाईन – “ नात्यात असमानता असेल तर मैत्री होऊ ( Talegaon Dabhade News) शकणार नाही. समता, संवाद आणि समंजसपणा असेल तर कोणत्याही नात्यामध्ये मैत्री फुलू शकते. समाज स्वास्थ्य जपण्यासाठी माणूसपण जपले पाहिजे. त्यासाठी मानवता,समता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे.’’ असे उद्गार “मिळून साऱ्याजणी” या मासिकाच्या संपादिका आणि ज्येष्ठ स्त्री वादी समाजसेविका डॉ.गीताली वि. मं यांनी दिनांक. १२ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय नाट्य परिषद ,तळेगाव दाभाडे (मावळ) अंतर्गत महिला मंचाने आयोजित केलेल्या व्याख्यानात काढले.

Saraswati Vidyamandir : सरस्वती विद्यामंदिरमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
त्यांनी “नात्यातील मैत्री” या विषयावर अतिशय परिणामकारक आणि ओघवत्या वाणीने उपस्थितांशी संवाद साधला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मिळून साऱ्या जणी ( Talegaon Dabhade News) या मासिकाचे ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषद (तळेगाव दाभाडे) अध्यक्ष मा. श्री सुरेश धोत्रे,उपाध्यक्ष तसेच महिला मंच प्रमुख अपर्णा महाजन, प्रमुख कार्यवाह श्री.विश्वास देशपांडे, सचिव श्री.संजय वाडेकर, सतारवादक, श्री. विदुर महाजन (विश्वस्त) ,प्रसिद्ध लेखक श्री. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ आणि अनुराधा मोहिनी यांच्यासह तळेगाव मधील अनेक मान्यवर आणि रसिकांची उपस्थिती लाभली. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी उत्स्फूर्त उत्साहाने सहभाग घेतला.
Alandi : स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २३१ रक्तदात्यांचा सहभाग
अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष माननीय श्री सुरेश धोत्रे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या २० वर्ष यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला तसेच भविष्यात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून तळेगाव चा सांस्कृतिक वारसा पुढे चालविण्याचे संस्थेच्या वतीने आश्वासन ( Talegaon Dabhade News) दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन,पाहुण्यांची ओळख,स्वागत आणि आभार या सर्व कामांमध्ये महिला मंच सदस्य डॉ. अपर्णा महाजन ,शर्मिला शहा, शुभांगी कार्ले, राधा गोहाड, नयना डोळस,डॉ. वर्षा वाढोकर,वैशाली जामखेडकर, सीमा जोशी आणि रोहिणी पायघन यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या यशस्वी कार्यक्रमानंतर मंचाच्या पुढच्या कार्यक्रमाची सूचना सांगण्यात आली. त्यानुसार ९ सप्टेंबर २०२५ (दुसऱ्या मंगळवारी) रोजी वाचिक अभिनयाचा भाग म्हणून कथा वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात ( Talegaon Dabhade News) आले.