उपक्रमास 6 हजाराहून अधिक नागरिकांचा सहभाग
मावळ ऑनलाईन – ‘हर घर तिरंगा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये( Talegaon Dabhade News) आयोजित विविध उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे 6 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये विविध ठिकाणी घरोघरी जाऊन ‘हर घर तिरंगा’ हर घर स्वच्छता अभियानाबाबत( Talegaon Dabhade News) जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना परिसर स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमात 300 नागरिकांनी व 50 बचत गट महिलांनी सहभाग घेतला.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र.1 येथे विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी( Talegaon Dabhade News) माहिती देण्यासह परिसर स्वच्छता करण्यात आली. सरस्वती विद्या मंदिर येथे सीमेवरील जावानंकरिता विद्यार्थ्यांमार्फत राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.तसेच शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.
नगरपरिषदेमार्फत कॅनव्हास पेंटिंग आणि स्लोगन स्पर्धाही आयोजित करण्यात आली. थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. 2 येथे राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये 400 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि रोटरी कालब ऑफ तळेगाव दाभाडे आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रा सिटी रोड ते मारुती मंदिर चौक यादरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली.
हर घर तिरंगा-2025″ आणि “हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत शहरात घेण्यात आलेले उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये ( Talegaon Dabhade News) दिली आहे.