मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्राच्या प्रारूप ( Talegaon Dabhade News) प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. नगरपरिषदस्तरावर स्थापन झालेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार केलेला प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास विभागाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास पुणे विभागाचे माननीय विभागीय आयुक्त यांनी १३ ऑगस्ट रोजी हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
Metro : भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रोचा डिपीआर तयार
मान्यताप्राप्त प्रभाग रचना १८ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान प्रसिद्ध केली ( Talegaon Dabhade News) जाणार असून, नागरिकांना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत वेबसाइटवर ही माहिती पाहता येणार आहे. यासंदर्भात इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. हरकतींची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात येणार असून, नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतले जाईल.
Metro : भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रोचा डिपीआर तयार
यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असून, नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या रचनेबाबत थेट सहभागाची संधी उपलब्ध होणार ( Talegaon Dabhade News) आहे.