मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगावदाभाडे सिटी आयोजित (Talegaon Dabhade News) एक अनोखे दिवाळी गेट-टुगेदर श्री शिवाजी टॉकीज तळेगाव दाभाडे येथे ५९ मेंबर्ससह मौज.. मजा… दिल… दोस्ती… दुनियादारी असे अविस्मरणीय अनुभूती देणारे संपन्न झाले असून एक आगळावेगळा उपक्रम तळेगावकरांना पाहायला मिळाला.
रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी क्लब मधील मेंबर्स,ॲन्स, ॲनेट्स यांना दिवाळी भेट स्वरूपात श्री शिवाजी टॉकीज तळेगाव दाभाडे येथे सिनेमा दाखविण्याचे नियोजन केले होते. मेंबर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. पॉपकॉर्न.. कुरकुरे.. मुगडाळ.. वेफर्स…खारे शेंगदाणे,खारी पॅटीस… आईस्क्रीम इत्यादी पदार्थांचा आस्वाद घेताना शालेय व महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देणारा हा आगळावेगळा उपक्रम स्मरणात राहणारा आहे असे प्रतिपाद सहप्रांतपाल भालचंद्र लेले यांनी करताना उपक्रमाचे कौतुक करत सर्व मेंबर्सना दीपावलीच्या शुभेच्छा (Talegaon Dabhade News) दिल्या.
Vadgaon Maval: ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’!-मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा
पर्यावरण,शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमासह भारतीय सण आणि उत्सव पारंपारिक पद्धतीने रोटरी सिटीच्या माध्यमातून राबवताना परमपवित्र भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जपत एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतल्याचा मनापासून आनंद वाटतो असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे उपाध्यक्ष सुरेश दाभाडे सेक्रेटरी संजय मेहता इत्यादी सह ५९ मेंबर्सनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम (Talegaon Dabhade News) घेतले.



















