मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या ( Talegaon Dabhade) कै मावळ भूषण मामासाहेब खांडगे चौक व दत्तात्रय (आप्पा) खांडगे रस्त्याचे नामकरण उद्घाटन शनिवारी (दि २६) मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

Dr. Medha Kulkarni : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, सुरेश दाभाडे, बाबूलाल नालबंद, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल दाभाडे, ब्रिजेंद्र किल्लावाला,सुहास गरुड, ( Talegaon Dabhade) सुनील वाळुंज,अविनाश पाटील,ॲड श्रीराम कुबेर, मिलिंद शेलार, सुनील (नाना) भोंगाडे रोटरीचे पदाधिकारी, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी तसेच खांडगे परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुनील शेळके बोलताना म्हणाले की, तळेगाव शहराच्या ( Talegaon Dabhade) जडणघडणीसाठी तळेगाव येथील ज्यां मान्यवरांनी आपल्या हयातीत योगदान दिलेले आहे. अशा व्यक्तींना विसरता कामा नये म्हणून अशा व्यक्तींचीं स्मृती जतन करून ठेवण्यासाठी त्यांची नावे शहरातील रस्ते, शाळा, उद्याने, कार्यालय यांना देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार शेळके यांनी यावेळी बोलताना केली.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व विलास भेगडे यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव, अप्पासाहेब खांडगे प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष खांडगे यांनी आभार ( Talegaon Dabhade) मानले.