मावळ ऑनलाईन –ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे(Talegaon Dabhade) शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिर ट्रस्टतर्फे शनिवारी (दि.२७) कुमारिका पूजा, भोंडला, दांडिया, फुगडी, हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळ शाळा क्रमांक चार सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेच्या १२५ विद्यार्थिनीनी त्यात उत्साहाने भाग घेतला.
भोंडल्याची गाणी गात त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ह्या वेळी परिसरातील महिला, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने, शिक्षिका निकिता शितोळे, प्राची लोमटे, वैशाली साबळे, ताहेरा बासडे, सोनाली घाटे आणि शिक्षकवृंद उपस्थितीत होत्या.
Talegaon Dabhade: तळेगाव मधील विशाल शेटे आणि महेश भेगडे बनले आयर्नमॅन
Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सर्व मुलींना कुमारिका वाण म्हणून सावंत नांनीनी शालेय वस्तू भेट दिल्या. खिरापत, साखर फुटाणे, भेळ व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.अशा कार्यक्रम उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना समाजात वावरण्याची संधी मिळावी, त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहावे आणि आत्मविश्वास वाढावा हा ट्रस्टचा उद्देश असल्याचे श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजेश सरोदे यांनी यावेळी सांगितले.


येत्या बुधवारी नवचंडी याग(होम), भजन हरिपाठ, देवीचा जोगवा, देवीसूक्त,देवीचा मंत्रजप, कालभैरवाष्टक,आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.