मावळ ऑनलाईन –राव कॉलनी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ (Talegaon Dabhade)या खास महिला-स्नेही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैठणी जिंकण्याची संधी यामुळे महिलांचा सहभाग विशेष ठरला. विजेत्या महिलेला पैठणी भेट देण्यात आली. बक्षीस वितरण सारीका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुखलाल शिंदे, उद्योजक प्रशांत भागवत संस्थेचे अंकुश भेगडे, युवा नेते आशिष जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांसाठी पारंपरिक खेळांची रचना करण्यात आली होती उदा. लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, फुगडी, वेशभूषा स्पर्धा, आणि प्रश्नमंजुषा. याशिवाय कार्यक्रमात ‘सांस्कृतिक कट्टा’ अंतर्गत नृत्य, गाणं, आणि कविता सादरीकरणही झाले.
Abhang English Medium School: कृतियुक्त,आनंददायी गणिताचे शिक्षण देणारा उपक्रम शिक्षणप्रणालीसाठी आदर्श
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरली ती पैठणी स्पर्धा, जिचा विजेता महिलेला पारंपरिक पैठणीची भेट देण्यात आली.
राव कॉलनी विकास प्रतिष्ठानचे संयोजक नगरपरिष शिक्षण मंडळाचे माजी सभापती डॉ विशाल सतीशराव वाळुंज यांनी सांगितले की, “महिलांसाठी असे उपक्रम नियमित घेण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांचा सशक्त सहभाग समाजकार्यात वाढेल.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या रोहित चव्हाण, विक्रांत वाळुंज, आदित्य निकम, सागर वाळुंज, राहुल कडाळे, ओमकार जोशी, हर्षद चव्हाण आदि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्व महिलांनी एकमुखाने अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.