situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: इंद्रायणी महाविद्यालयाचा कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर;पिअर्सन शेअर मार्केट अकॅडमी यांच्याबरोबर सामंजस्य करार

Updated On:

मावळ ऑनलाईन –इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग (Talegaon Dabhade)आणि पिअर्सन शेअर मार्केट अकॅडमी, निगडी यांच्यात आज सामंजस्य करार (mou) झाला. विद्यार्थ्यांना शेअर बाजार, गुंतवणूक, अर्थशास्त्र व व्यावसायिक कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचा या करारामागचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमामागे पिअर्सन अकॅडमीचे संस्थापक डॉ. दिनकर चव्हाण आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सदाशिव मेंगाळ यांचा पुढाकार होता. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष समज मिळणार आहे.

करारानिमित्त आयोजित कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संस्थेचे सेक्रेटरी श्री. चंद्रकांतजी शेटे, डॉ. सत्यम सानप, डॉ. अर्चना जाधव, प्रा. प्रणिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कार्यवाह श्री. शेटे म्हणाले, “इंद्रायणी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. अशा सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.”

Talegaon Dabhade: हिंदी चित्रपट गीते : केवळ करमणूक नव्हे, तर संस्कृतीचे आरसे

Pune News : मिलिंद सबनीस यांना ग. वि. केतकर स्मृती पुरस्कार

प्राचार्य डॉ. मलघे यांनी नमूद केले की, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षणाला प्राधान्य आहे. पिअर्सन अकॅडमीसारख्या नामांकित संस्थेच्या सहकार्याने हे ध्येय साध्य होईल.”

डॉ. दिनकर चव्हाण यांनी ही भागीदारी ‘आर्थिक साक्षरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल’ असल्याचे सांगितले. “शेअर मार्केट ही फक्त कमाईची नव्हे, तर शिस्त, संयम व निर्णयक्षमता शिकवणारी शाळा आहे,” असे ते म्हणाले.

या कराराअंतर्गत लवकरच विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कार्यशाळा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाच्या या दूरदृष्टीपूर्ण पावलाचे सर्वत्र स्वागत होत असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Follow Us On