मावळ ऑनलाईन – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दिवाळी सणाच्या (Talegaon Dabhade)पार्श्वभूमीवर दिनांक (१६ ऑक्टोबर) रोजी दिवाळी सूर संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून तळेगाव दाभाडे नगरी तसेच मावळ पंचक्रोशीतील विद्यार्थी, नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी या सांगितिक मैफिलीचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते. याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष शैलेश शहा, उपाध्यक्ष संजय साने ,खजिनदार निरुपा कानेटकर, इतर संस्था पदाधिकारी, तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तळेगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालय, इंद्रायणी महाविद्यालय, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या विविध विभागांच्या वतीने संस्थेच्या भव्य लॉनवर या सांस्कृतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत गायक संदीप पंचवाटकर यांच्या नियोजनातून साकारलेल्या दिवाळी सुर-संध्या या कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम नामवंत गायक कौस्तुभ दिवेकर, राजेश्वरी पवार, संदीप उबाळे, प्रीती पेठकर, आदी गायकांनी हिंदी- मराठी गाण्यांची पेशकष करून रसिकांची मने जिंकली. कौस्तुभ दिवेकर यांच्या स्त्री आवाजातील गाण्यांना उपस्थित रसिकांनी विशेष दाद दिली.
Pune: भरतनाट्यम् नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके



संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्णवंदनेने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर उत्तरोत्तर मैफल रंगत जाऊन माऊली माऊलीच्या नाम घोषणात मैफिलीची सांगता झाली.
याप्रसंगी हवेमध्ये फुगे सोडून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे व कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच आकाशामध्ये रंगीत दिवे सोडून दीपावली सणाच्या शुभेच्छा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी उपस्थितांना दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश शहा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केले.