वाहतूक, रस्ते, वीज व कामगार सुविधा या विषयांवर ठोस चर्चा
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके ( Talegaon Dabhade) यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन (TDIA) ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस TDIA अध्यक्षा श्रीमती अनु सेठी, उपाध्यक्ष श्री. जगदीश यादव, तसेच तळेगाव MIDC पोलिस निरीक्षक श्री. रणजित जाधव यांच्यासह नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस पावले उचलण्यात आली ( Talegaon Dabhade) तळेगाव MIDC परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. यासाठी ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, ह्युंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण तसेच इतर प्रलंबित रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.
Talegaon Dabhade News : तळेगाव स्टेशन चौकामध्ये पडलेले खड्डे बुजविण्यासाठी रास्ता रोको
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या . चाकण–शिंदे वासुली व शिंदे वासुली–पॉवर हाऊस मार्गावरील प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी थेट सूचना दिल्या. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे ( Talegaon Dabhade) वासुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे MIDC भागात काम करणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
MIDC मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत आमदार सुनील शेळके यांनी ठोस भूमिका घेतली. “उद्योगांच्या प्रगतीसाठी सततचा वीज पुरवठा आवश्यक आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे ते यावेळी स्पष्टपणे म्हणाले.
बैठकीस उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या CSR फंडातून मावळ तालुक्यातील ( Talegaon Dabhade) सामाजिक व विकासकामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार शेळके यांनी CSR फंडातील रक्कम स्थानिक विकासासाठी वापरण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला.
या बैठकीस एफ.ई.व्ही इंडिया, एलअँडटी डिफेन्स, इमर्सन प्रा. लि., हुसको हायड्रॉलिक्स, अॅटलास कोपको, ओगनिबेनी इंडिया लि., पॉस्को आयपीपीसी प्रा. लि., चिकात्सो इंडिया, शेफ्लर इंडिया, के.एस.एच प्रा. लि., ए.एम लाइटिंग, बोर्गवॉर्नर इंडिया, व्हिटेस्को टेक्नॉलॉजी, ( Talegaon Dabhade) एस.एच. पिटकर ऑर्थोटूलिंग, विनोआ २ एफी आदी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
TDIA च्या या बैठकीत घेतलेले निर्णय उद्योग क्षेत्राचा विकास, वाहतूक व्यवस्था सुधारणा, वीज पुरवठा स्थैर्य आणि स्थानिक कामगार व समाजाच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.या सर्व निर्णयांमध्ये आमदार सुनील शेळके यांची सक्रिय भूमिका आणि पुढाकार उद्योगनगरीच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरणार आहे, असे सर्वांचे ( Talegaon Dabhade) एकमत झाले.