मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी वर्षानिमित्त (Talegaon Dabhade)रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरास एकूण ३२३ रुग्णांनी सहभाग घेतला असून ५२ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे व ७८ चष्मे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमास तळेगाव जनरल हॉस्पिटलचे चेअरमन शैलेशभाई शहा, उपाध्यक्ष चंद्रभान खळदे, संचालक विनायक अभ्यंकर, प्रमुख पाहुणे डॉ शाळीग्राम भंडारी, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे, गोल्डन रोटरीचे अध्यक्ष रो संतोष परदेशी, रो. डॉ. नेहा कुलकर्णी डिस्ट्रिक्ट ३१३१ मेडिकल कमिटी हे उपस्थित होते.
विशेष उपस्थिती भाऊसाहेब सरदेसाई यांचे नातू नितीन सरदेसाई व त्यांचा परिवार आवर्जून उपस्थित होता.
Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
तळेगाव जनरल हॉस्पिटल च्या शताब्दी वर्षानिमित्त गोल्डन रोटरीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन जनरल हॉस्पिटल चा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो दिपक फल्ले यांनी केले तर प्रास्ताविक रो डॉ. धनश्री काळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन रो. प्रशांत ताये यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रो .राकेश गरुड, रो प्रदीप मुंगसे, रो प्रदीप टेकवडे , रो बसप्पा भंडारी, रो डॉ. सौरभ मेहता, रो विजय गोपाळे, रो किरण ओसवाल, रो निखिल महापात्रा, रो चेतन पटवा ,रो दीक्षा वायकर, रो मेधा शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या डॉ. कल्पिता राऊत, नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल मोनालिसा पारगे एडमिन ऑफिसर संगीता निसवाडे सर्व सिस्टर्स, नर्सिंग विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली.
कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. नेत्र तपासणीसोबतच नेत्रदान जनजागृती हेदेखील या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे हे समाजोपयोगी कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

