मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संग्रामभाऊ जगताप मित्र परिवार आणि आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या संकल्पनेखाली हे शिबिर शनिवार, २२ जून २०२५ रोजी हॉटेल ड्रीम लँड हॉल, तळेगाव दाभाडे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
Talegaon : तळेगाव येथील डॉ. मुबारक खान करणार जगभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन
या शिबिरास सिनेअभिनेते मोहन खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शिबिरात नागरिकांना नवीन मतदान कार्ड (१८ वर्षे पूर्ण झालेल्यांसाठी), आयुष्यमान भारत कार्ड, विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले योजना कार्ड, आणि रेशन कार्डच्या ई-केवायसीची प्रक्रिया यांसारख्या आवश्यक सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यांचा समावेश आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संग्रामभाऊ जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर, नागरिकांना शासकीय सुविधा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान सुकर करण्याच्या उद्देशाने आहे. हरि ओम ग्रुप देखील या आयोजनात सहकार्य करत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शासकीय योजनांचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.