मावळ ऑनलाईन –सहकारी पतसंस्थांचा कारभार करताना पतसंस्थेने आर्थिक शिस्तीचे(Talegaon Dabhade) पालन करणे महत्त्वाची असते.संस्थेची पारदर्शकता,समन्वय,सभासदांचे हित, नियोजनबद्ध कारभार याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून लौकिकास पात्र ठरली आहे,असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉलमध्ये आयोजित केलेल्या पतसंस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक,ज्येष्ठ नेते, सहकार भूषण बबनराव भेगडे हे होते. यावेळी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले, पुणे पीपल्स बँकेचे चेअरमन जनार्दन रणदिवे, पी डी सी सी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, मावळ विचार मंचचे भास्करराव म्हाळसकर पतसंस्था फेडरेशनचे सचिव तथा पतसंस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे,संजय असवले,सुरेश धोत्रे,अशोक घारे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष समीर भेगडे,खजिनदार अमित भसे,सचिव अतुल राऊत, संचालक अंकुश आंबेकर, सल्लागार बबनराव भोंगाडे, डॉ.शाळीग्राम भंडारी,महेशभाई शहा,विलास भेगडे,संजय ओसवाल,चंद्रजीत वाघमारे,माजी अध्यक्ष राहुल पारगे, रामभाऊ गवारे, शोभाताई भेगडे, रजनीताई ठाकूर, संजय वाडेकर, यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेने महिलांसाठी सुरू केलेली महिला सन्मान ठेव योजना व संस्थेमार्फत असलेल्या विविध योजनांची माहिती संस्थेचे आधारस्तंभ व पतसंस्था फेडरेशनचे सचिव संतोष भेगडे यांनी यावेळी दिली.
Manoranjan Sandhya 2025: आज पासून “मनोरंजन संध्या २०२५” ची धमाकेदार सुरुवात ! प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे महिलांसाठी खास पर्व
Pune: पुणे रेल्वे स्थानकावर दोन दिवसांत १४ अल्पवयीन मुले ताब्यात : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेतून बचाव

संस्थेच्या ४६ कोटी ७३लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर ३३ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून या आर्थिक वर्षात संस्थेला ८६ लाख१० हजार रुपयांचा नफा झाला आहे. तसेच संस्थेने यावर्षी सभासदांना ११% लाभांश जाहीर केला आहे.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्किटेक्ट प्रियांका भेगडे, व्यवस्थापिका तस्लिम सिकिलकर, श्री समर्थकृपा महिला बचत गट यांना सन्मानित करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक शरद भोंगाडे यांनी केले.राहुल पारगे यांनी अहवाल वाचन केले.अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले.शंकर भेगडे यांनी आभार मानले.नियोजन महाव्यवस्थापक अनिल भोमे व सर्व संचालक मंडळांनी केले.





















