situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: शिवशंभू स्मारकाचे स्वप्न साकार ; स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते अनावरण

Published On:

मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथे दीड दशकानंतर साकार (Talegaon Dabhade)झालेल्या श्री शिवशंभू तीर्थ स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ फूट उंचीच्या भव्य समूहशिल्पाचे अनावरण स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते झाले.

तळेगावकरांनी पाहिलेले श्री शिव शंभू स्मारकाचे स्वप्न दिड दशकांनंतर अखेर साकार झाले. तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री शिवशंभू तिर्थ स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ फुट उंचीच्या भव्य समुहशिल्पाचे अनावरण सोमवारी (ता.२०) श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

Defence Sector: रक्षा क्षेत्रातील कामगारांची दिवाळी काली….

समूहशिल्पाच्या चौथऱ्यावर फुलांच्या तोरणांची आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. पारंपारिक ढोल ताशा, तुताऱ्यांनी लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने किल्ले लोहगडावरुन काढण्यात आलेल्या शिवज्योतीसह स्मारकास मानवंदना देण्यात आली. श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते मंत्रोपचारांच्या गजरात समुसहशिल्पास सात नद्यांच्या जलाभिषेक करण्यात आला. मंत्रपुष्पांजली अर्पण करुन वंदन करण्यात आले. मावळ पंचक्रोशीतील गडकोटांवरून आणलेल्या मशाली तसेच देशभरातील १०० ऐतिहासिक महादुर्गावरुन आणलेले पवित्र जलकुंभ आणि मृदा येथील स्मारकाच्या भूमीत विलीन करण्यात आले. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमुदूमून गेला होता.



अनावरण झाल्यानंतर समूहशिल्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान केलेल्या शिवशंभू प्रेमींमुळे वातावरण भगवेमय झाले होते.

या प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, सत्येंद्रराजे दाभाडे,सत्यशीलराजे दाभाडे,श्री शिव शंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्रनाथ दाभाडे, संतोष दाभाडे, संजय बावीसकर, विजय काळोखे,रविंद्र भेगडे, युवराज काकडे आदींसह समितीचे सदस्य आणि शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे सम्राटांमधले संत : स्वामी गोविंद देव गिरी महाराज

अनावरणानंतर बोलताना श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले कि, पूजा करण्याकरिता मंदिर शिल्लक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते. संघर्ष करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अख्खा देश बुडत चाललेला होता, किंबहुना धर्म बुडालेला होता. सगळीकडून केवळ अत्याचाराच्या आरोळ्या ऐकू येत होत्या. मंदिर उध्वस्त होत होती. सगळीकडे अंधार पसरलेला होता. अशा या भीषण अंधारात भारतीय राष्ट्राची ज्योत प्रज्वलित झाली ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळेच. भगवान श्रीराम हि हिंदू धर्माची पहिली आवृत्ती तर छत्रपती शिवाजी महाराज हि दुसरी आवृत्ती होती. छत्रपती शिवाजी महाराज्यांची पावनगाथा ही धार्मिक व्यासपीठावरती गेली पाहिजे यासाठी मी गेली पंचवीस वर्षं लढतोय.छत्रपतींमधले विभूतीमहत्व त्यांच्यामधला दैवी अंश हा सगळ्या लोकांच्या अंतःकरणात निर्माण करणे हि आजची आवश्यकता आहे. माझ्या डोक्यात एक वारी घेऊन मी हिंडतोय संपूर्ण देशामध्ये शिवचैतन्याची जागृती करणं हा देशातल्या सगळ्या समस्यांना उभा आहे हे लक्षात घ्या. हे सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रात घडले पाहिजे. पुण्यात आणि बारा मावळात घडलं पाहिजे.

Follow Us On