मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे,गोल्डन रनिंग ग्रुप व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योगाशिबिर आयोजित करण्यात आले होते.
योग करा व निरोगी रहा,सुदृढ शरीरासाठी नियमित योग करावे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक आदित्य कसाबी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी,प्रशांत ताये,प्रदीप टेकवडे,सहप्रांतपाल दीपक फल्ले,किरण ओसवाल, डॉ सौरभ मेहता,मंगेश मारवाडी,अमोल हिंगे,विशाल खळदे,अविनाश कुरणे हे उपस्थित होते.
तेली समाज मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.
Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ
योगेश शिबिरानंतर अल्पोपहाराची व्यवस्था स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख गौरव क्षीरसागर,स्माईलचे संस्थापक हर्षल पंडित,दिनेश चिखले,राकेश गरुड,रीतेश फाकटकर,भरत खेडेकर,बाळू चव्हाण,साक्षी चिकुर्डे, संपदा कुरणे,रोहित रागमाले यांनी केले.