मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे झालेल्या भीषण अपघातात सीआरपीएफमधील एका जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपी वाहनचालकाने निष्काळजीपणे कार चालवत स्कूटीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्प गेट क्रमांक १ समोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी मृत जवानाचा सहकारी प्रभाकरन एम (वय ४१, रा. सीआरपीएफ कॅम्प, कोयना बॅरेक, तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली असून, तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी सुरज रोहिदास नवघणे (वय २८, रा. ब्राम्हणवाडी, साते, ता. मावळ) यास अटक करण्यात आली आहे.
Abhang English Medium School: कृतियुक्त,आनंददायी गणिताचे शिक्षण देणारा उपक्रम शिक्षणप्रणालीसाठी आदर्श
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
आरोपीने आपल्या ताब्यातील नेक्सॉन कार (एमएच-१४-जेएम-०३१२) भरधाव वेगात चालवत स्कूटी (एमएच-०५-बीपी-५७२२) ला जोरदार धडक दिली. यात स्कूटीवरील अनमोल विश्वनाथ राय (वय ४१) गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून, पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.