मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या घरासमोर एका महिलेने जादूटोणा (Black Magic) केल्याचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठ येथे घडली.
या प्रकरणी सुहास बळीराम गरुड (४९, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमल पांडुरंग भेगडे (शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lohagad Crime News : लोहगड येथे किरकोळ कारणावरून महिलेसह तरुणाला मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर असलेल्या गाडी पार्क करण्याच्या ठिकाणी महिला आरोपीने येऊन फिर्यादीची गाडी (एमएच १४/जीवाय ३६२३) पार्क केलेल्या ठिकाणी एका कागदात लिंबू आणि त्यावर हळद-कुंकू टाकून जादूटोणा केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
PCU : पीसीयूच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी
सुहास गरुड म्हणाले, “मी समाजासाठी व इनाम जमीन प्रकरणातील जुन्या केसेस पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यामुळे रागातून माझ्या राहत्या घरासमोर जादूटोण्याचा (Black Magic) प्रकार करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा प्रकार कैद झाला आहे. मला पोलीस संरक्षण मिळावे.”