मावळ ऑनलाईन – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना (Talegaon Dabhade Crime News) अटक केली. ही कारवाई रविवारी (6 जुलै) सायंकाळी पुणे मुंबई महामार्गावर घोरवडेश्वर डोंगराजवळ करण्यात आली.
Maharashtra Education Icon : यशोधन सोमण “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” पुरस्काराने सन्मानित
अशोक बाळू भारती (22, कासार आंबोली, मावळ), प्रशांत उर्फ पैलवान शांताराम आंबेकर (26, देवळे, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रीतम सानप यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Talegaon Dabhade Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला प्रदीप सिरॅमिक क्रोकरी समोर दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार भारती आणि प्रशांत आंबेकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 55 हजार रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून (Talegaon Dabhade Crime News) आली.